Belagavi

लॅण्ड जिहाद’ रूपी काळा कायदा करावा रहित

Share

भारतात चालू असलेला सर्वांत मोठा लॅण्ड जिहाद’ रूपी काळा कायदा रहित करण्यासाठी हिंदूंना संघटितपणे आवाज उठवावा लागेल, असे आवाहन, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाइये यांनी केले.

भारतनगर, शहापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. मनोज खाडये पुढे म्हणाले, हलालच्या आर्थिक जिहादप्रमाणे मुसलमानांच्या वक्फ बोर्डाकडून लॅण्ड जिहाद चालू आहे. वक्फ बोर्डाला या कायद्याने हिंदूंची घरे, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्ती बळकवण्याचे
पाशवी अधिकार देण्यात आले आहेत. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी हिंदूंची भूमी हडप केल्याचे प्रकार उघड होत आहेत.

वर्ष २००९ मध्ये वक्फ बोर्डाकडे ४ लाख एकर असलेली भूमी आज ८ लाख ६० हजारहून अधिक एकर भूमी झाली आहे. एवढी भूमी वक्फ बोर्डाकडे कशी आली ? भारत सरकारच्या ‘भारतीय सेने’ कडे सर्वाधिक १८ लाख एकर भूमी, तर ‘भारतीय रेल्वे’ कडे १२ लाख एकर भूमी आहे. या दोघांच्या नंतर देशभरात तिसरी सर्वांत मोठी संपत्ती वक्फ बोर्डाकडे आहे. वक्फ कायदा रहित केला नाही, तर काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल. ‘हलाल’ ही इस्लामिक संकल्पना ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या भारतातील बहुसंख्य ७८ टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ सारख्या खाजगी मुसलमान संस्था उत्पादकांकडून हजारो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत. भारतातही ‘जमियत उलेमा- ए-हिन्द’ देशभरातील विविध बाँबस्फोटांत सहभागी मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका निर्माण करणार्या ‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा. असे आवाहन त्यांनी केले.

या सभेसाठी मोठ्या संख्येने हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदु राष्ट्राचा जयघोष केला. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाड्ये, हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर, तसेच रणरागिणी शाखेच्या बेंगळुरू जिल्हा समन्वयक भव्या गौडा यांनीही मार्गदर्शन केले.

या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी शंखनादानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहित चैतन्य छत्रे आणि त्यांचे सहकारी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा बेळगाव जिल्हा समन्वयक हृषिकेश गुर्जर यांनी मांडला. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे आणि . दिव्या शिंत्रे यांनी केले.

Tags: