Belagavi

बेळगावमधील अनगोळ स्मशानभूमीची दुरावस्था

Share

बेळगावमधील अनगोळ स्मशानभूमीत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे, भटक्या कुत्र्यांचे हे स्मशान निवासस्थान बनले आहे ,महापालिकेने याकडे लक्ष देऊन , या स्मशानाची स्वच्छता करावी असेच मागणी , अनगोळवासियानी केली आहे .

बेळगाव शहरातील अनगोळ भागासाठी असलेल्या स्मशानभूमीत बाहेरून कचरा आणून टाकत आहेत . यामुळे सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे . स्मशानात महानगर पालिकेकडून स्वच्छता केली जात नाही . त्यामुळे रान वाढले असून , कचऱ्याचे ढीग साचले आहेत . रात्रीचे स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जायचे झाल्यास लाईट नसल्याने , असुविधा होते . तसेच भटक्या कुत्र्यांची देखील दहशत आहे .


याविषयी आपली मराठीला माहिती देताना इथल्या रहिवाशांनी सांगितले कि , अनगोळ येथील स्मशानाची दुरावस्था झाली आहे . यासंदर्भात अनेकदा महापालिकेला निवेदने दिली . मात्र काहीच उपयोग झाला नाही . स्मशानात कचरा टाकण्यात येत आहे . स्मार्ट सिटी असलेल्या बेळगावमधील , अनगोळ स्मशानभूमीकडे महानगर पालिका लक्ष द्यायला तयार नाही . स्मशानात दुर्गंधी पसरली आहे .

तर अन्य दोघा रहिवाशांनी सांगितले कि , या स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे . स्मशानात अंत्यसंस्कारासाठी रात्री गेल्यावर ते अंगावर धावून येतात . शिवाय स्मशानात लाईट देखील नाही . महापालिकेने , याकडे लक्ष देऊन , स्मशानाच्या स्वच्छतेकडे आणि अन्य गोष्टींकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली .

 

Tags: