Belagavi

मनपा व्यायाम शाळेचा विकास सूर्यवंशी ‘बेळगाव श्री-2023’चा मानकरी

Share

मराठा युवक संघ आणि बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेने आयोजित केलेल्या बेळगाव श्री व बेळगाव हर्क्युलस बॉडी बिल्डिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. मनपा व्यायाम शाळेचा विकास सूर्यवंशी ‘बेळगाव श्री-2023’चा मानकरी ठरला.

मराठा मंदिराच्या सभागृह बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने मराठा युवक संघ आयोजित जिल्हास्तरीय 57 व्या बेळगाव श्री 2023 किताबाचा मानकरी मनपा शाळेचा विकास सूर्यवंशी ठरला. बेस्ट पोजर उमेश गंगणे तर बेळगाव हर्क्युलस मानाचा किताब प्रवीण कणबरकर याने पटकाविला. विजय गौडा उपविजेता, तर सुनील चौधरीने तिसरा क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण किल्लेकर, मराठा युवक संघाचे कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, पुरस्कर्ते एस एस एस स्पोर्टस फौंडेशनचे अध्यक्ष संजय सुंठकर, सिद्धार्थ उंदरे, दिगंबर पवार, संजय मोरे, शिवाजी हंडे, सदानंद शिंदोळकर, महादेव चौगुले, नारायण किटवाडकर, संजय चव्हाण, आनंद हंगिरगेकर, नारायण सप्ले, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, सचिव चंद्रकांत गुंडकल, उपाध्यक्ष मारूती देवगेकर, श्रीकांत देसाई, नेताजी जाधव, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, पंच अजित सिद्धण्णावर , एम के गुरव, गंगाधर एम या मान्यवरांच्या हस्ते विविध गटातील विजेत्यांना व किताब विजेत्याला रोख रक्कम स्मृतीचिन्ह व किताब देऊन गौरविण्यात आले, या स्पर्धेसाठी पंच एम के गुरव, एम गंगाधर, अनंत लंगरकांडे, हेमंत हावळ, नूर मुल्ला, सुनील पवार, प्रशांत सुगंधी, सुनील राऊत, सुनिल अष्टेकर बसवराज अरळीमट्टी यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे 55 किलो गट आकाश निगराणी पॉलिहैड्रोन, ज्योतिबा बिर्जे भवानी जिम, नारायण जोशीलकर मंथन जिम, सुनील भुजनाल रॉ फिटनेस, केतन भातकांडे युनिव्हर्सल जिम.


60 किलोगट उमेश गंगणे एसएसएस फाउंडेशन, बबन पोटे रॉ फिटनेस,रोहन अल्लूर मनपा जिम, कपिल कामाण्णाचे रॉ फिटनेस,ओमकार पाटील युनिव्हर्सल जिम.
65 किलो गट विनायक अनगोळकर बॉडी बेस जिम, नागेश संताजी श्री समर्थ जिम, मंजुनाथ सोनटक्की बॉडी फिटनेस, रोहन पालनकर फिटनेस जिम, विजय निलजी भैरू फिटनेस जिम.
70 किलो गट विजय पाटील बेस्ट स्ट्रॉंग जिम, सुनील भातकांडे एक्स्ट्रीम जीम,संदीप पावले मॉडर्न जिम, विनीत हणमशेट रा फिटनेस, गणेश पाटील मोरया जिम.
75 किलो गट प्रताप कालकुंद्रीकर पॉलिहाइड जिम, अफोज ताशिलदार गोल्ड जिम, राहुल हिरोजी युनिव्हर्सल जिम, विनायक चव्हाण बॉडी बेस, अंकुश तापले बॉडीवर्क जिम, 80 किलो गट महेश गवळी रुद्रा जिम ,गजानन काकतीकर एसएसएस फाउंडेशन ,दयानंद निलजकर बॉडीबेस जीम,प्रशांत पाटील फिटनेस जिम खानापूर.

80 किलोवरील गट विकास सूर्यवंशी मनपा जिम, व्ही बी किरण राजू मोरे फाउंडेशन, एम, बी साकीब सेव्हन स्टार जीम,राघवेंद्र नाईक मोरया जिम.
बेळगाव हर्क्युलस -2023 किताब प्रवीण कणबरकर याने जिंकला तर उपविजेता विजय गौडा तिसरा सुनील चौधरी यांनी जिंकले.

Tags: