खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगोळ्ळी रायण्णा स्मारकाशेजारील एका चंदनाचे झाड शासनाची कोणतीही परवानगी न घेता तोडून त्याचे तुकडे आपल्या ताब्यात ठेवून स्वत:च्या वापरासाठी अवैधरित्या त्यांची वाहतूक केल्यावरून पोलिसांनी एकाला अटक केली.

याबाबत मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून नंदगड पोलीस ठाण्याचे ए.एस. आय. श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. बेळवडी, एम. एम. मुल्ला, यु . बी. शिंत्री, बसवराज लमाणी यांनी छापा मारून आरोपी बिदरभावी गावातील आनंद मारुती रामण्णवर याला अटक केली. त्याच्याकडून चंदनाच्या लाकडाचे तुकडे जप्त केले. गुन्हा क्र. 35/2023 कलम 379 आयपीसी आणि कलम 86, 87 कर्नाटक वन कायदा 1963 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करण्यात येत आहे.


Recent Comments