हुक्केरी शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या महालक्ष्मी यात्रेची भक्तांच्या अलोट गर्दीत सांगता झाली. यात्रेच्या शेवटच्या दिवशी भक्तांनी देवीला सोन्याचा रेडा अर्पण केला.

शनिवारी सकाळी दयामव्वाचा रथ लक्ष्मी मंदिराकडे आल्यावर भाविकांनी देवीला हातावर झुलवत लक्ष्मी मंदिराशेजारील मंडपात विराजमान केले. पाच दिवसांच्या यात्रा काळात विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पडले.
मोठ्या संख्येने महिलांनी खणानारळासह भक्तिभावाने ओटी भरून लक्ष्मी आणि दयामव्वा देवींचे दर्शन घेतले. सायंकाळी रिंगणात दावेदारांनी देवीला सोन्यापासून बनवलेला रेडा अर्पण करून देवीला शांत केले. यावेळी भंडाऱ्याची उधळण करत गावाच्या शिवारात असलेल्या सीमेमध्ये प्रवेश केला.
याबाबत बोलताना यात्रा कमिटीचे सचिव गुरू कुलकर्णी म्हणाले की, हुक्केरी शहरात दर तीन वर्षांनी भरणारी ही जत्रा यावेळी गावातील सर्व समाजाच्या सहकार्याने व पोलीस, हुक्केरी वीज संघ व नगरपालिका अधिकारी यांच्या सहकार्याने पार पडली. गुढीपाडव्याला बडिगेर गल्लीत देवीची विशेष पूजा करून नववर्षाचे स्वागत केले जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बापू नाईक, माजी मंत्री शशिकांत नाईक, जयगौडा पाटील, रवी पाटील, सी. पी. पाटील, नगराध्यक्ष ए. के. पाटील, संजय निलजगी आदी उपस्थित होते.


Recent Comments