Belagavi

जीआयटी ऑरा -२०२३ मध्ये प्रख्यात बॉलिवूड सिंगर बेन्नी दयाल यांचा लाईव्ह शो

Share

बॉलिवूडचे आघाडीचे नवोदित गायक बेन्नी दयाल यांनी आपल्या सुरेल आवाजाने बेळगावच्या तरुणाईवर जादू करून , त्यांना आपल्या गाण्यांवर थिरकायला लावले .

बेळगावच्या प्रतिष्ठित ,के एल एस संस्थेच्या , जी आय टी कॉलेजमध्ये ऑरा २०२३ या सांस्कृतिक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते . या फेस्टिवल मध्ये गायक बेन्नी दयाळ अयान लाईव्ह कन्सल्ट कार्यक्रम पार पडला . त्यांनी कैसे मुझे तुम मिल गइ या गाण्यात कार्यक्रमाची सुरुवात केली . त्यानंतर त्यांनी आपलं गायलेली गाणी , सादर केली . या गाण्यांवर तरुणांसह तरुणीदेखील बेफाम होऊन नृत्य करीत होते .

त्यांनी घुमरू , बँग बँग, लत लग गई , बदतमीज , जय जय शिवशंकर , बेफिक्रे अशी दमदार गाणी सादर करून लाईव्ह शो मध्ये रंगत आणली .
या लाईव्ह शो मुळे तरुण तरुणींचा उत्साह शिगेला पोचला होता . प्रत्येक गाण्याला वन्स मोअर मिळत होता . केलेस व्यवस्थापन मंडळातर्फे ,गायक दयाल यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला प्राध्यापक, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: