निवडणूक आयोगाच्या आदेशाला धाब्यावर बसवून , जिल्हाधिकाऱ्यांचा सूचनेनंतर देखील मतदारांना भेटवस्तू ,कुपन्सवर स्वतःचे फोटो लावून,वाटण्यात येत असल्याची तक्रार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शुभम शेळके यांनी करून , त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली .
या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले कि , आगामी निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन,निवडणुकीच्या निमित्ताने , जनतेला पैसे , घरगुती सामान, किंवा मोफत कुपन , कसल्याही प्रकारची आमिषे दाखवलंतर निवडणूक आयोगाच्या आदेशावरून , कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला होता . निवडणुकीदरम्यान आमिषे दाखवणे हे हा गुन्हा आहे .
तेव्हा इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी , अशी सूचना त्या बैठकीत करण्यात आली . अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते . असे असूनदेखील , हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी साडया , कुर्ते , ताटे आणि कुपन्स तसेच भेटवस्तू मतदारांना वाटत आहेत . आम्ही
पुराव्यानिशी जिल्हाधीकार्यांना माहिती दिली आहे . जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली .
सत्ताधारी भाजप नेत्यांना पाठीशी घालू नये असे शुभम शेळके म्हणाले .


Recent Comments