विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना निपाणीतील रोहिदासनगर येथे घडली.

ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. अक्षय वाल्मिकी श्रीखंडे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. या घटनेबाबत बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अक्षयच्या घरासमोरील एका महिलेने रोहिदासनगर जवळील विहिरीत कोणीतरी पडलेले पाहिले.
तिने आरडाओरडा करताच काही तरुणांनी धाव घेऊन पडलेल्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न फसला. दरम्यान, पोलिसांसह अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद करिकट्टी, कॉन्स्टेबल मारुती कांबळे हे घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली .


Recent Comments