पॉवर स्टार, लोकप्रिय आवडता अप्पू, बाल कलाकार म्हणून लोकप्रिय कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार याचा वाढदिवसविजापूर शहरात त्याच्या चाहत्यांनी साजरा केला.
शहरातील जोरापूर पेठ येथे पुनीत राजकुमार याचा चाहता बाबू जगदाळे यांच्या वतीने ए पी ग्रुप यांच्या वतीने पुनीत राजकुमार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, नेत्र दान संकल्प कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांना रोपे वाटप करून करण्यात आली.

रक्तदान शिबिरात शेकडो तरुणांनी रक्तदान केले. यावेळी त्यांनी नेत्रदानाचे आश्वासन दिले. हजारो लोकांना अन्नप्रसादाचे वाटपही करण्यात आले.
एपी ग्रुपचे अध्यक्ष एरन्ना पटनाशेट्टी, बीडीएचे माजी अध्यक्ष भीमशंकर हडनुरान नगरसेवक महेश वोडेयार, सनी गवीमठ आणि इतर अनेकजण उपस्थित होते. रक्तदान व नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले.


Recent Comments