विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे आणि शिक्षकांशी समन्वय साधणे , पालकांनी आवश्यक असल्याचे मत कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक अभिनंदन सुळकुडे यांनी व्यक्त केले.

मगेण्णावर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षकांप्रमाणेच आपल्या पाल्याच्या शिक्षणाबद्दल पालकांनी जागरूक राहिले पाहिजे . वेळोवेळी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती जाणून घेण्यासाठी शिक्षणाशी समन्वय साधला पाहिजे .

यावेळी श्री लक्ष्मी क्रेडिट सौहर्द संस्थेचे सीईओ सागर मंगसुळे, मुख्य व्यवस्थापक प्रदीप मगगेण्णावर, संस्थेच्या अध्यक्ष शीतल मगेण्णावर, डॉ. विजयकुमार उपाध्याय, रुक्मिणी सारापुरे, शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यालयात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

यावेळी रावसाहेब कोठीवाले, सुभाष मायण्णवर, जिनाप्पा शेडबाळे, वैभव बागेवाडी उपस्थित होते. शिवलीला कोकणे यांनी सांगितले. रक्षिता कोकरे यांनी स्वागत केले.


Recent Comments