भाजपच्या तत्व-सिद्धांतावर, विचारसरणीवर विश्वास ठेवून मी पक्षात आलोय, लक्ष्मण सवदी आणि माझ्यात कसलाही करार झालेला नाही असे स्पष्टीकरण आ. महेश कुमठळ्ळी यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीत अथणी मतदारसंघात तिकीट कोणाला मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि आ. महेश कुमठळ्ळी यांच्यात करार झाल्याचे वृत्त पसरले आहे. त्यावर आज अथणी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. महेश कुमठळ्ळी यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपात येण्यापूर्वीच या पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून, सवदी यांना सर्व कल्पना देऊन मी भाजपात आलोय. याची हायकमांडलाही कल्पना आहे.
परंतु त्यांच्यात आणि माझ्यात कसलाही करार झालेला नाही. मी किंवा सवदी यांनीही त्याबाबत प्रसारमाध्यमांपुढे कधी विधान केलेलं नाही. पण प्रसामाध्यमांत तशा बातम्या येत आहेत. त्यात काही तथ्य नाही. यावरून विषयांतर होऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देत आहे. पक्षात अंतर्गत व्यवहार हायकमांडच्या पातळीवर चालतात. हायकमांडचा निर्णय आम्हला बंधनकारक आहे. सवदी यांनीही अनेकवेळा तसे सांगितले आहे असे आ. महेश कुमठळ्ळी यांनी स्पष्ट केले
एकंदर, अथणी मतदारसंघातील निवडणुकीच्या उमेदवारीवरून सुरु असलेल्या चर्चेवर आ. महेश कुमठळ्ळी यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे.


Recent Comments