Belagavi

सीईआयआर तंत्रज्ञानाने चोरलेल्या मोबाईलचा शोध

Share

बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून सीईआयआर तंत्रज्ञानाचा वापर करून, बेळगाव शहरात चोरलेले, हरवलेले, हिसकावून घेतलेले मोबाईल शोधले जात आहेत.

या तंत्रज्ञानाने आतापर्यंत 18 मोबाईल सापडले असून, मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. जनतेने मोबाईल चोरीला गेल्याची/ हरवलेली/मोबाईल स्नॅचिंग होताच जनतेने केएसपी ऍप्लिकेशनद्वारे पोर्टलवर केस नोंदवावी, सीईआयआर तंत्रज्ञानाचा चांगला वापर करावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांनी या सुविधेच्या शोधात सहभागी झालेल्या पीआय सीईएन पोलिस स्टेशन, जॉन्सन डिसोझा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Tags: