उत्तर कर्नाटकातील नामवंत अशा गोगटे तांत्रिक महाविद्यालयात , औरा २०२३ ह्या सांस्कृतिक महोत्सवाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन प्राचार्य डी ए कुलकर्णी यांनी केले .
बेळगावमधील केएलएस संस्थेच्या गोगटे तांत्रिक महाविद्यालयात , या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते . ते म्हणाले कि दर्जेदार आणि गुणवत्ताप्रधान शिक्षण देण्याबरोबरच , विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा तसेच

मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात . या सांस्कृतिक महोत्सवात , देशातील नामवंत महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत . विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन प्राचार्य डी. ए . कुलकर्णी यांनी केले .
मागील दोन तीन वर्षात या सांस्कृतिक महोत्सवात खंड पडला होता . मात्र यंदा मोठ्या उत्साहात , विविध स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत . तीन दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात , फॅशन शो , डान्स , गायन , फोटोग्राफी , इ गेमिंग , प्रश्नमंजुषा , आणि अन्य स्पर्धा होणार आहेत . शिवाय गायक बेंनी डायल याचा लाईव्ह शो होणार आहे .

एकंदर , तीन वर्षानंतर आयोजित केलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाला देशातील नामवंत महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले असून , वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते सहभागी होऊन , आपले कौशल्य सादर करणार आहेत .


Recent Comments