सदाशिवनगर येथील गौरी महिला मंडळाच्या वतीने , जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी महिलांनी शिक्षित होऊन स्वावलंबी जीवन जगावे असा सल्ला उपमहापौर रेश्मा पाटील यांनी दिला .
मंडळाच्या अध्यक्षा जयश्री कराडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बेळगाव महानगर पालिकेच्या नूतन महापौर , शोभा सोमनाचे तसेच उपमहापौर रेश्मा पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .
यावेळी मंडळाकडून महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले .

यावेळी , मंडळाच्या उपाध्यक्ष प्रेमा यत्तीनमनी , सुजाता गोकावी , ऍड . सविता पाटील , डॉ . शिल्पा वागराळी , तसेच मंडळाच्या जेष्ठ सदस्या समाजसेविका सरला हेरेकर , उपस्थित होत्या .वासंती हिरेमठ, श्रद्धा सानिकोप्प, महादेवी हागरगी , नंदा इंचल , सुरेख रायणगउदार , श्वेता नायकर आदी उपस्थित होत्या .


Recent Comments