Belagavi

२० मार्चला काँग्रेस नेते राहुल गांधींचा बेळगाव दौरा

Share

तरुणांना प्रेरणा देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी 20 मार्चला येणार आहेत. ते गुरुवारी प्राथमिक बैठक घेणार आहेत अशी माहिती केपीसीसीचे कार्याध्यक्ष सलीम अहमद यांनी दिली .

शहरातील काँग्रेस भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बेळगावात आगमनाच्या निमित्ताने सीपीडी मैदानावर महामेळावा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी या बैठकीचे नेतृत्व करतील, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या हस्ते होणार्या अधिवेशनाला सुमारे 10 जिल्हा काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. रोड शो करायचा की नाही याचा निर्णय प्राथमिक बैठकीत घेतला जाईल, असे ते म्हणाले.

राज्यातील ४० टक्के कमिशन सरकारच्या विरोधात आम्ही लढत आहोत. भाजप सरकार वचनबद्ध नाही. त्यांचा कार्यक्रम भ्रष्टाचाराचा आहे. नालायक सरकार विजय संकल्प यात्रा करत आहे.असे ते म्हणाले .

राज्यातील भाजप सरकारने भ्रष्टाचार आणि दरवाढीबद्दल जनतेची माफी मागावी. महादयी नदी सिंचनाचे काम सुरू करून दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे सरकार आले तर मी तुम्हाला स्वर्ग दाखवेन, असे ते म्हणालेहोते . पण स्वर्ग कुठे आहे?असे त्यांनी विचारले .

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात आल्यावर राऊडी शीटरचे स्वागत करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राऊडी शीटरला भेटण्याची परवानगी का? त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

बेळगाव काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षा विनय नावलगट्टी, शहरी विभागाचे अध्यक्ष राजू सेठ, विधान परिषद सदस्य नारायण स्वामी आदी उपस्थित होते.

Tags: