Belagavi

खोटे आरोप करणाऱ्या बीईओची करावी बदली

Share

बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री गावातील शासकीय वरिष्ठ प्राथमिक कन्नड शाळा बाळेकुंद्री के.एच. शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत माहिती घेतली असता कागदपत्रे तपासली असता त्यांनी सुमारे रु.3,00,000/- चा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे कर्नाटक भीमसेना बेळगाव जिल्हा युनिटच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले .

 

माननीय क्षेत्र शिक्षणाधिकारी यांनी भ्रष्टाचाराची नोटीस बजावली पाहिजे होती परंतु क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात विविध प्रश्न विचारले आहेत . , मात्र त्यांचा आमच्याशी संबंध नाही, असे सांगत त्यांनी कर्नाटक भीमसेनेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांवर खोटे आरोप केले आहेत. तसेच विद्यमान व माजी शिक्षकांना अनुचित प्रश्न विचारून धमकावणे हे त्यांचे काम आहे. तसेच या नोटीसमध्ये त्यांच्यावर कारवाई होईल अशी भीती ते व्यक्त करीत आहेत , त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आणि आमच्या संस्थेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सरकारी निधीचा गैरवापर होऊ नये आणि विभागांनी प्रामाणिकपणे चांगले काम करावे, याची जाणीव लोकांना व्हावी यासाठी आमची संघटना प्रामाणिकपणे लढत आहे.

खोटा आरोप करणार्या क्षेत्र शिक्षणाधिकार्याची तत्काळ बदली करावी अशी मागणी आम्ही कर्नाटक भीमसेना बेळगाव जिल्हा संघाकडून करत आहोत. (बाईट )
यावेळी प्रवीण मदार , अक्षय के.आर. अजय शिंगे आणि संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते .

Tags: