Belagavi

आ. हेब्बाळकर यांनी केले स्मार्ट क्लास सेवेचे उदघाटन

Share

“विविध भागातील सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लास सेवा सुरू करण्यासाठी भरपूर निधी दिला जात असून, येत्या काही दिवसांत जवळपास सर्वच शाळांमध्ये स्मार्ट क्लासेस सुरू होतील आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल . ” असे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले .

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मुतगा गावातील शासकीय वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळेला पुरविण्यात आलेल्या नवीन स्मार्ट क्लास सेवेचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या

स्मार्ट क्लास सेवेमध्ये प्रोजेक्टर, एसी, बेंच, यूपीएस आणि इन्व्हर्टर, कॉम्प्युटर, प्रिंटर, टॅब, स्मार्ट कॅबिनेट, पोडियम, खिडकीचे पडदे, दरवाजा, मॅट्स, डिजिटल सामग्री, इलेक्ट्रिशियन, वॉल क्लॉक, नेम प्लेट, पेंटिंग, टाइल्स इत्यादी उपकरणांचा समावेश आहे.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक गजानन मुतगेकर, श्याम मुतगेकर, गजानन कणबरकर, पिंटू मल्लवगोल, संदीप पाटील, श्याम पाटील, गजानन पाटील, महेश पाटील व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: