गावामध्ये हायस्कुल मंजूर करावे यासाठी , बेळगाव तालुक्यातील कुकडोळी गावातील लोक अनेक वर्षांपासून मागणी करीत आहेत . सरकारने मागणी मान्य न केल्याने , नवीन हायस्कूलच्या मंजुरीसाठी गावातील गणेश मंदिरात रक्ताने पत्र लिहिले
कुकडोळी हे गाव बेळगाव ग्रामीण मतदारसंघात येते . 2017 पासून गावात हायकूल मंजूर करावे यासाठी मागणी करून लढा देत आहेत पण तरीदेखील सरकारने प्रतिसाद दिला नाही . त्यामुळे ग्रामस्थांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला. नवीन हायस्कूलच्या मंजुरीसाठी गणेश मंदिरात रक्ताने पत्र लिहिण्यात आले . राज्यपाल, मुख्यमंत्री आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री यांना या पत्राद्वारे ग्रामस्थांनी आवाहन केले
यावेळी गावातील तरुण मारुती सरवरी, विठ्ठल बडस, रमेश लकमोजी, पुंडलिक राजपूत, किरण हट्टी, श्रीकांत हट्टी, बाबू लकमोजी,आणि इतर उपस्थित होते .


Recent Comments