गेल्या अनेक वर्षांपासून , मुस्लिम समाज बांधवांच्या समस्यांना प्रतिसाद देणारे एकमेव असे आ . श्रीमंत पाटील हे धर्मनिरपेक्ष नेता आहेत . त्यामुळे मुस्लिम समाजाचा विकास झाला आहे असे मत शेडबाळ मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नजीर मुल्ला यांनी व्यक्त केले.

मुस्लिम समाज बांधवांसाठी 10 लाख रुपये खर्चातून शादी महल आणि 20 लाख रुपये खर्चातून कब्रस्तानची संरक्षक भिंत बांधण्याच्या कामकाजाचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. आमदारांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार केल्यानंतर नजीर मुल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कागवड तालुक्यातील शेडबाळ रस्त्यात शहरात रस्ते, समुदाय भवन व इमारतींसाठी ५५ लाख खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

आमदार श्रीमंत पाटील यांनी शेडबाळ स्थानकात अंगणवाडी इमारत, दलित समाज बांधवांसाठी समाज भवन, अंबाबाई मंदिरात विश्वकर्मा समाजासाठी सामुदायिक भवनाचे भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ केला.
आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनात जात, धर्म असा भेदभाव नाही, फक्त माझे विकासासाठी लाख मोलाचे लक्ष आहे .
दलित नेते सुभाष दळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम.ए.गणे यांची भाषणे झाली .
या कार्यक्रमाला पक्षनेते राजू नांद्रे, एम.बी.पाटील, विजय कांबळे, महाधवल यादवाडे , उत्कर्ष पाटील, किरण एंडगौडर, सदाशिव मंगळे, वसंत शिंदे, ठेकेदार सुनील देवर्षी, महेश माळी, महावीर पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments