महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राजहंसगडाला भेट दिली.
या भेटीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरील विस्तृत जागेत 19 रोजी होणाऱ्या सोहळ्याचे कशा पद्धतीने आयोजन करायचे याबाबत चर्चा करून पाहणी करण्यात आली.
अभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांसह महाप्रसाद वाटपाची व्यवस्था कशी केली जावी? तसेच वाहतूक आणि पार्किंगची सोय वगैरे बाबींवर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. सोहळ्यादिवशी येळ्ळूरसह आसपासच्या गावातील गावकऱ्यांच्या मदतीने येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गडाच्या पायथ्याशी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार असून त्याविषयीही चर्चा झाली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी याबद्दल माहिती दिली . शिष्टमंडळात खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, साहित्यिक गुणवंत पाटील, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण – पाटील, येळ्ळूर समितीचे दुद्दाप्पा बागेवाडी, वामन पाटील, प्रकाश अष्टेकर, राजू पावले, दत्ता उघाडे, महेश जुवेकर आदींचा समावेश होता


Recent Comments