award

‘नाटू-नाटू’ला ऑस्कर : मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलं टीम आरआरआरचं अभिनंदन

Share

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट आरआरआरमधील ‘नाटू-नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी टीम आरआरआरचं अभिनंदन केलं आहे.

बोम्मई यांनी ट्विट करून दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि टीम आरआरआरचं अभिनंदन केलं आहे. ‘आरआरआरच्या ‘नाटू-नाटू’ या गाण्याने ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीत ऑस्कर अकॅडमी अवार्ड जिंकून एक नवा इतिहास निर्माण केला आहे.

 

या कामगिरीबद्दल एस. एस. राजामौली आणि टीम आरआरआरचं अभिनंदन ! हा सुंदर चित्रपट बनविल्याबद्दल एम. एम. किरावानी यांचेही खास अभिनंदन !

 

जग आमचे सिनेमे पहात आहे आणि त्यांचे कौतुकही करत आहे’ असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Tags: