महिलांनी हिमतीने घराबाहेर पडून , पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला हवे असे , बनशंकरी महिला मंडळाच्या अध्यक्षा लीलावती चिटगी यांनी सांगितले .
बनशंकरी महिला मंडळाच्या वतीने , महिला दिन साजरा करण्यात आला . यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, कि , दोन वर्षांपूर्वीपासून आम्ही सर्व महिला मिळून , मंडळ स्थापन करून काम करीत आहोत .

महिलांचे आरोग्य , मुलांचे शिक्षण , त्याचप्रमाणे अनेक स्पर्धा आयोजित केल्या आहेत . याचा उद्देश एकच आहे कि , आपल्या जीवनातील थोडा वेळ समाजासाठी द्यावा , आणि महिलांच्या विकासासाठी काम करावे . आजच्या ह्या कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस , नृत्य स्पर्धा असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत . पंधराहून जास्त महिलांनी विविध वेशभूषा करून , या कार्यक्रमाचा आनंद लुटला .
यावेळी , स्पर्धेचे परीक्षक म्हणून भारती गावडे , ज्योती बिरादार यांनी काम पहिले . यावेळी महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते .


Recent Comments