कडक उन्हाळा सुरु झाल्याने , बेळगाव शहरात अनेक ठिकाणी मातीपासून तयार केलेले माठ खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत . परप्रांतीय लोक या माठांची विक्री करीत आहेत .
बेळगावचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे . उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत . तहानेने जीव व्याकुळ होत आहेत . तहान भागवण्यासाठी लोक , कोल्ड्रिंक , सरबते फ्रिजमधील पाण्याचा वापर करीत आहेत .पण तरीदेखील तरीही तहान काही भागात नाहीय .
शहरात मातीपासून तयार केलेले माठ विक्रीसाठी आले आहेत . राजस्थान , अहमदाबाद , गुजराथ , कलकत्ता आदी ठिकाणचे , कलाकुसरीचे आणि , पाण्याच्या विविध क्षमतेचे माठ बेळगाव नगरीत दाखल झाले आहेत . यांना गरिबांचे फ्रिज म्हणून संबोधले जायचे . मात्र आता हा माठ सर्वच वर्गातील लोक खरेदी करू लागले आहेत . याचे कारण म्हणजे माठातील पाणी प्यायल्याने होणारे फायदे . त्यामुळे आता गरीब श्रीमंत असा भेद न करता, सर्वांच्याच पसंतीस हे माठ उतरत आहेत .
बेळगावमधील काँग्रेस रोडसहित अन्यत्र हे माठ विक्रीला ठेवल्याचे दिसून येत आहेत . काँग्रेस रोडवरील एका विक्रेत्याने सांगितले कि,वाढत्या उन्हामुळे ,मातीच्या माठांची मागणी वाढली आहे . आम्ही अन्य राज्यातून , अहमदाबाद, गुजराथ , राजस्थान त्याचप्रमाणे कलकत्ता येथून आम्ही हे माठ मागवून त्याची विक्री करीत आहोत . विविध आकारात , आणि क्षमतेचे माथा इथे उपल्बध असून ग्राहकांची मोठी मागणी आहे . तीनशे ते पाचशे रुपये असा याचा दर आहे .
तर एका ग्राहक महिलेने सांगितले कि , मातीच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी हितकारक असून , उन्हाळ्यात या माठातील पाणी प्यायल्याने तहान भागते . शिवाय आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहेत.
एकंदर , उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी , थंड पाणी तर मिळतेच शिवाय आरोग्य देखील चांगले रहात असल्याने , या मठाच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे .


Recent Comments