हुक्केरी शहराच्या बाहेरील भागात शेतकरी देणगी स्वरूपात जनतेकडून पैसे जमा करून रस्ता तयार करत आहेत.

होय, हे सत्य आहे.शेकडो शेतकरी ज्यांना अनेक वर्षांपासून त्यांच्या पिकांची वाहतूक करण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे, त्यांनी जनतेकडून पैसे गोळा करून रस्ता बांधकाम सुरू केले आहे.

जुने कोचरी रोडलगत गेल्या अनेक वर्षांपासून राहणाऱ्या इर्शाद मोकाशी, मुन्ना कलावंत आणि आनंदसिंग मुरगिडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शहराला जोडणारा रस्ता नसल्याची बाब लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली पण त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यामुळे आता शेतकरी स्वत:च्या पैशातून रस्ता बनवत आहेत.तसेच पक्के रस्ता करण्यासाठी शासनाची मदत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लक्ष्मण निलजगी, करप्पा कामटे, रवी दड्डीमनी, मुन्ना कलावंत, तमन्ना पाटील, इर्शाद मोकाशी, एम.आर.मोकाशी, आनंद मुरगोड, शानुर मोकाशी आदी उपस्थित होते.


Recent Comments