Mandya

ते आले, त्यांनी जिंकलं ! मंड्या येथे मोदींचा भव्य रोड शो

Share

ते आले, अन त्यांनी जिंकलं, असं वर्णन करता येईल असा भव्य रोड शो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंड्या येथे केला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी, भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दूतर्फा उभे राहून मोदींना अभिवादन करत त्यांचे स्वागत केले.

होय, मंड्या येथे विविध विकासकामांच्या उदघाटनाची आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंड्याच्या जनतेने आज भव्य स्वागत केले. विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी मोदींनी शहरात भव्य रोड शो केला. सुमारे लाखाहून अधिक मंड्यावासियांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मोदी मोदी असा अखंड जयघोष नागरिक करताना दिसून आले.

कडक सुरक्षा व्यवस्थेत पंतप्रधान मोदींच्या रोड शोला रविवारी सकाळी मंड्या येथे प्रारंभ झाला. रोड शोच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही कडेला बॅरिकेड्स उभारून नागरिकांना मोदींना अभिवादन करण्याची सोय करण्यात आली होती. तेथे उभे राहून सर्व वयोगटातील लोक मोदींना अभिवादन करत होते. मोदीदेखील कारच्या दर्शनी भागात डाव्या बाजूला उभे राहून लोकांचे अभिवादन स्वीकारून हात उंचावून लोकांना अभिवादन करत होते. यावेळी जनतेने मोदींच्या कारवर मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण करून मोदींवरील प्रेम व्यक्त केले. मोदींनीही आपल्या चाहत्यांवर त्याच फुलांची उधळण करत प्रतिसाद दिला. त्यामुळे उपस्थित लोक भारावून गेले.

मोदींच्या रोड शोच्या मार्गावर सर्वत्र भगवे झेंडे, भाजपचे पक्षध्वज, भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींचे त्यांची आई हिराबेन यांच्यासमवेतची छायाचित्रे, कटआउट्स उभारण्यात आले होते. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय मोदींच्या स्वागताचे भाजप नेत्यांच्या प्रतिमांसह कटआउट्स देखील उभारण्यात आले होते. रोड शोच्या दरम्यान नागरिकांनी भारतमाता की जय, मोदी मोदी असा अखंड जयघोष केला. त्यांना एक वेगळेच स्फुरण चढल्याचे दिसून आले.

Tags: