Chikkodi

१४ ते १८ मार्चला करोशी गावात श्री महालक्ष्मी यात्रा

Share

चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावातील श्री महालक्ष्मी देवीची भव्य जत्रा महोत्सव १४ मार्च ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे.अशी हेस्कॉमचे संचालक महेश भाटे यांनी दिली .

करोशी गावात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, बेळगावच्या रेणुकाश्रमाच्या ,मातोश्री गंगामाता यांच्या नेतृत्वाखाली दर तीन वर्षांनी भरणारी लक्ष्मी देवाची जत्रा ही राज्यातील एकमेव अशी जत्रा आहे जिथे तीन लक्ष्मी मूर्ती साकारतात. जत्रे दरम्यान 14 मार्च रोजी लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जाईल, त्यानंतर रात्री 10 वाजता तिन्ही देवतांची भव्य मिरवणूक निघेल.

15 मार्च रोजी सकाळी दंडवत व सायंकाळी महानैवद्य, मनोरंजनासाठी नाटक , तसेच वाद्यवृंदाचे आयोजन करण्यात आले आहे . 17 मार्च रोजी घोड्यांची शर्यत , सायकल आणि धावण्याची स्पर्धा व सायंकाळी भव्य सामाजिक नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
18 मार्च रोजी दुपारी 3 वाजता देवीची मिरवणूक व विसर्जन होणार आहे.

चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, आमदार दुर्योधन ऐहोळे, महांतेश भाटे यांच्यासह मान्यवर येऊन देवीचे दर्शन घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लक्ष्मीदेवीची यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी चिक्कोडी पोलिस चोख बंदोबस्त ठेवणार आहेत. गावात यापूर्वीच सुमारे २५ सीसी कॅमेरे बसविण्यात आले असून, लाइव्ह कॅमेऱ्यांसह आणखी २५ कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत विजय कोठीवाले, अण्णाप्पा शेंडुरे, दुंडया पुजारी,बसवराज हळीजोळे, बाळू मुगळी, पंचाक्षरी हळीजोळे, गुरप्पा निर्वाणी, बसवप्रभू भाटे, अजिता मगदुम्म, एकनाथ जेधे, महेश चौदनवर, संजय कांबळे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

Tags: