Hukkeri

कत्ती परिवारातर्फे आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिरातील २२० शिबिरार्थींची नेत्र शस्त्रक्रिया

Share

हिरा शुगरचे अध्यक्ष निखिल कत्ती यांनी विश्वनाथ कत्ती व राजेश्वरी कत्ती ट्रस्टच्या वतीने हुक्केरी सार्वजनिक रुग्णालयात 8 मार्चपासून मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांचे, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे व मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

माजी खासदार रमेश कत्ती यांनी हुक्केरी सार्वजनिक रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून समस्या समजावून घेतल्या.
माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांनी सांगितले की, कत्ती परिवारातर्फे आगामी काळात विविध आजारांवर उपचारासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना निखिल कत्ती यांनी सांगितले कि , याआधी 550 रुग्णांची तपासणी केली आहे, त्यापैकी 220 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत आणि उर्वरित रुग्णांवर टप्प्याटप्प्याने उपचार केले जातील आणि शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उदय कुडची, मुख्य वैद्यकीय अधिकारी महांतेश नरसनवर, डॉ. प्रगती बोरगावकर, हिरा शुगरचे संचालक अशोक पट्टणशेटटी , बसवराज मरडी, राजू मुन्नोल्ली, प्रज्वल निलजगी, मिर्झा मोमिन, शाहजना बडगावी, मोशिन इनामदार आदी उपस्थित होते.

Tags: