सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात औषध उपचार व्हावेत यासाठी बेळगाव येथील विजया हॉस्पिटल व डॉ. रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, होनगा यांच्या सहयोगाने चव्हाट गल्लीतील मारुती मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, डॉ. सोमशेखर व डॉ. उमेश शिंदोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅल्शियम पातळी, पित्ताशय अशा विविध आजारांवर मोफत तपासणी, औषधोपचार करण्यात आले. शिबिरामध्ये सुमारे पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यावेळी सुनील जाधव म्हणाले, समाजातील गरजू लोकांना महागडे उपचार परवडत नसल्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ. रवी पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे. येत्या पुढील काही दिवसात विविध भागात सकाळी 6 ते ८ या वेळेत शिबीर सुरू राहणार आहे. या अंतर्गत दररोज पाचशे रुग्णांची तपासणी होणार आहे. शिबिरात सहभागी होण्यास विविध भागांतील युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. रवी पाटील यांना विजय हॉस्पिटलच्या कार्यालयात संपर्क साधून रितसर आपल्या भागातील वेळ व तारीख नोंदणी करावी असे आवाहन केले.
यावेळी किरण एस. सांबरेकर किसन रेडेकर, किरण सिंडरेला, शिद्रायसह अन्य गल्लीतील नागरिक उपस्थित होते.


Recent Comments