Belagavi

बसवण कुडची गावात होणार श्री बसवण्णा , कलमेश्वर ,ब्रम्हदेव जत्रा

Share

दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही बेळगाव तालुक्यातील बसवण कुडची येथील श्री बसवण्णा , कलमेश्वर ,ब्रम्हदेव जत्रेला सुरुवात झाली आहे

शनिवारी पहाटे गावकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने बैलगाडे घेऊन पहाटे काकती डोंगरावर जाऊन इंगळ्या चे लाकूड आणले आहेत .त्यानंतर सोमवारी सकाळी विधिवत पूजा होऊन सायंकाळी 4वाजता हरहर महादेव च्या गजरात गुलालाची उधळण करून आंबील गाडे मिरवणूक होणार आहे.मंगळवारी देवाला अभिषेक घालुन सायंकाळी 5 वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे .तसेच बुधवार व गुरुवार खळ्यांच्या कुस्त्या होणार आहेत .जत्रेची पाडव्या दिवशी सांगता होते.

बेळगाव शहरापासून पाच कि.मी. अंतरावरील बसवण कुडची हे गाव सर्वधर्मीयांचे संगम झाले आहे. बसवेश्वर, कलमेश्वर आणि ब्रह्मदेवाचे पवित्र स्थान असल्याने हा परिसर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.यावेळी आमदार अनिल बेनके यांनी गावकऱ्यांना 9 हजार केळी,7 क्विंटल कुळीथ, 500 कलिंगड चे वाटप करून गावकऱ्यांना जत्रेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील सुमारे 7हजार हुन अधिक गावकरी काकतीच्या डोंगराला गेले होते, यावेळी आमदार अनिल बेनके, नगरसेवक बसवराज मोदगेकर,अप्पूनी चौगुले, परशराम बेडका,भरत भातकांडे,अनिल चौगले, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: