Hukkeri

सरकारी वसतिगृहांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : रमेश कत्ती

Share

विद्यार्थ्यांनी सरकारी वसतिगृहांचा लाभ घेऊन शैक्षणिक प्रगती साधून आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन माजी खासदार रमेश कत्ती यांनी केले.

हुक्केरी येथील समाजकल्याण विभागातर्फे तीन कोटी वीस लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अनुसूचित जाती मॅट्रिकोत्तर मुलांच्या वसतिगृहाचे लोकार्पण यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, हुक्केरी शहरात मुलांचे सुसज्ज वसतिगृह बांधण्यात आले आहे. दिवंगत उमेश कत्ती यांच्या विशेष प्रयत्नातून त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. येथे विद्यार्थ्यांची योग्य काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी ठेकेदार पुंडलीक नंदगावी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार एस. बी. इंगळे, हुक्केरी नगराध्यक्ष ए. के. पाटील, उपाध्यक्ष आनंद गंध, समाजकल्याण अधिकारी ए. एच. राऊत, हिरा शुगरचे संचालक अशोक पट्टणशेट्टी, नगरसेवक राजू मुन्नोळी, रियाज मुल्ला, मिर्झा मोमिन, लाजम नायकवडी, आलम मकानदार, मियासाब मोकाशी, बसवराज मर्डी आदी उपस्थित होते.

Tags: