धारवाड तालुक्यातील बेलूरजवळील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकीने गतिरोधकाला धडक दिल्याने एक वर्षाची मुलगी व तिची आई जागीच ठार झाली.

चिक्कोडी तालुक्यातील नागराळ गावातील संगव्वा हेग्गन्नावर (२०) आणि त्यांची एक वर्षाची मुलगी मायाक्का यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
जक्कप्पा हेग्गन्नावर पत्नी आणि मुलीसह हुबळीला जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकाला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. त्यामुळे आई व मुलीचा जागीच मृत्यू झाला तर जक्काप्पा जखमी झाले. एका वर्षाच्या मुलीच्या डोक्याला जबर मार लागला आहे.
गरग पोलिस ठाण्याचे पीएसआय सत्तीगौडर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments