राज्यात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार असताना धारवाडला आयआयटी मंजूर करण्यात आली होती. काँग्रेसनेच धारवाडमध्ये स्थापन व्हावी यासाठी भक्कम पाया रचला असा दावा माजी मंत्री विनय कुलकर्णी यांनी केला आहे.
विद्याकाशी धारवाडमध्ये आयआयटीचे उद्घाटन होत आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. आयआयटी कर्नाटकला मंजूर झाल्यावर रायचूरला होईल, अशी चर्चा होती. मग आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे आयआयटी केंद्र धारवाडमध्येच स्थापन व्हावे, असा आग्रह धरला. मात्र, नंतर आयआयटी रायचूर सोडून म्हैसूरला करण्याचे ठरले. ते धारवाडमध्ये परत आणण्यासाठी आम्हा सर्वांना खूप संघर्ष करावा लागला, असे ते म्हणाले. आमच्या संघर्षाचे बक्षीस म्हणून आज धारवाडमध्ये आयआयटीचे उद्घाटन होत आहे.
तत्कालीन उद्योगमंत्री आर.व्ही. देशपांडे यांनी आयआयटीला ५०० एकर जमीन उपलब्ध करून देण्याचे काम केले. आयआयटी येथे येण्यात अनेक कायदेशीर अडचणी होत्या. आम्ही सर्व रेल्वे मार्ग, विमान सुविधा, बस सुविधा दाखविल्या आहेत. भाजपच्या नेत्यांनीही आमच्यासोबत काम केले. ते म्हणाले की, आयआयटी धारवाडमध्ये आणण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले आहे. आम्ही यापूर्वी मागणी केल्याप्रमाणे या आयआयटीमध्ये कर्नाटकातील २५% विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा. ज्या कुटुंबांनी आयआयटीला जमीन दिली त्यांच्या मुलांना तिथे डी ग्रेड नोकऱ्या द्याव्यात. उद्या उद्घाटनावेळी याची घोषणा करावी, अशी मागणी विनय कुलकर्णी यांनी केली आहे.


Recent Comments