गदग तालुक्यातील नागवी येथील ग्रामीण विकास आणि पंचायत राज विद्यापीठाच्या कौशल्य भवन येथे आयोजित विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ थाटात पार पडला. यावेळी कुलपती व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी बेळगाव येथील कट्टणभावी गावचे गांधीवादी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
यावेळी बोलताना राज्यपाल थावरचंद गेहलोत म्हणाले की, कृषी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि आजच्या कृषी क्षेत्रात बदल होण्याची गरज असून कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासोबतच सेंद्रिय शेतीवर भर दिला पाहिजे.
यावेळी राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णुकांत चटपल्ली, कुलसचिव बसवराज लक्कण्णावर, जिल्हा पंचायत सीईओ डॉ. सुशीला बी., अपर जिल्हाधिकारी एम. पी. मारुती आदी उपस्थित होते.


Recent Comments