वकिलांनी न्यायालयीन कामकाजात मोठ्या आस्थेने भाग घेतला तरच व्यावसायिकता वाढू शकते. नवोदित वकील कायद्याशी अध्यात्माची सांगड घालून उत्तम वकील होऊ शकतात,” असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. एस. पाच्छापुरे यांनी सल्ला दिला.
बेळगावात के. एल. एस सोसायटीच्या राजा लखमगौडा विधी महाविद्यालयाच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एम. के. नंबियार राष्ट्रीय प्रारूप न्यायालय (म्यूट कोर्ट) स्पर्धेचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, वकिली व्यवसायात संयम आणि सहिष्णुता खूप महत्त्वाची आहे. अनेक किचकट प्रकरणे येतात. त्यांचा सविस्तर अभ्यास करून युक्तिवाद करावा लागतो. अशावेळी व्यवसाय आणि अध्यात्माची सांगड घालून, शांत चित्ताने अभ्यास करून युक्तिवाद केला पाहिजे असा सल्ला न्या. पाच्छापुरे यांनी दिला.

प्रमुख पाहुणे के. एल. एस. संस्थेचे सचिव व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, विधी व्यवसायात प्रेम आणि विश्वास मिळतो, जो समाजात अन्य कोणत्याही पदावर असताना मिळत नाही. वकिलाला कायद्याची अधिक माहिती असल्यास तो चांगला वकील होऊ शकतो. पैशाच्या मागे न धावता ज्ञानाच्या मागे लागलो तर पैसा आपसूकच येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
म्यूट कोर्ट स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. यामुळे न्यायाधीश आणि एक चांगला वकील म्हणून विकसित होण्यास मदत होते. कायदेशीर व्यवसायात संयम खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण समाजातील समस्यांना कसे प्रतिसाद द्यावे हे शिकू शकता. वकील म्हणून त्यांनी जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर असले पाहिजे. महाविद्यालयाच्या संचलन मंडळाचे अध्यक्ष एम. आर कुलकर्णी यांचे अध्यक्षीय भाषण झाले.

याप्रसंगी स्पर्धेचे प्रायोजक आणि भारताचे निवृत्त महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांच्या कामगिरीचे स्मरण करून, त्यांनी एवढ्या लहान वयातही त्यांनी दाखवलेल्या उत्साहाचे उदाहरण दिले आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे अशी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार यांनी स्वागत केले. सदस्य आर. एस. मुतालिक, स्पर्धा समन्वयक अश्विनी परब, विद्यार्थी प्रतिनिधी क्षमा भट्ट, तेजस्विनी संशोळे, सौम्या शेट्टी, तसेच प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments