बेळगावच्या शेट्टी गल्लीतील दोन कुटुंबे राहत असलेल्या घराला अचानक शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून सुमारे 40 लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
बेळगाव शहरातील शेट्टी गल्ली येथे लागलेल्या आगीच्या घटनास्थळी भेट दिली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, शैक्षणिक व महत्वाची कागदपत्रे यासह अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेट्टी गल्लीतील या घटनेत कोणाचीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली.
जळीतग्रस्त घरातील रहिवासी परशुराम किल्लेकर यांनी शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करून घटनेबाबत अधिक माहिती दिली.
दरम्यान, उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आज सकाळी 11.45 वाजता घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पीडित कुटुंबाना शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बेळगावचे तहसीलदारही उपस्थित होते त्यांनी आगीच्या घटनेची माहिती घेऊन शासनाच्या वतीने मदतीसाठी सर्व प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी स्थानिक नगरसेवक मुझमिल ढोणी, शकील मुल्ला यांच्यासह सरकारी अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments