बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील मसणाई स्वसहाय संघाच्या वतीने महात्मा फुले मंगल कार्यालय येथे जागतिक महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास वेणुध्वनी रेडिओ चॅनेलच्या मनीषा सरनाईक आणि सहकार दर्शनच्या वसुधा सांबरेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसणाई स्वसहाय संघाच्या संध्या पाटील या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात स्फूर्ती ग्रुपमधील सदस्यांच्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वल करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजिका प्रेमा पाटील यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संध्या पाटील यांच्याहस्ते उपस्थित पाहुण्यांचे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी ‘महिलांचे स्वावलंबन आणि आर्थिक साक्षरता’ यावर मार्गदर्शनपर विचार मांडले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेमा पाटील, संध्या पाटील, कमल पाटील, हेमलता मोहनगेकर, शामल पाटील, लक्ष्मी पाटील, सरिता पाटील, रुक्मिणी पाटील, संजीवनी पाटील, लता पाटील आदींसह मसणाई स्वसहाय संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळाच्या सदस्या यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा पाटील यांनी तर आभार हेमलता मोहनगेकर यांनी मानले.


Recent Comments