Belagavi

कडोली मराठी साहित्य संघातर्फे जागतिक महिलादिन

Share

कडोली येथील मराठी साहित्य संघातर्फे संघाच्या कार्यालयामध्ये जागतिक महिलादिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा पाटील, प्रमुख पाहुण्या म्हणून पुज्य ब्रम्हकुमारी वंदना दीदी, ग्रा. पं. सदस्या डॉ. सौ.प्रतिभा पाटील व सौ. उज्वला उच्चुकर तर प्रमुख वक्त्या म्हणून गुंजेनट्टी सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता पाटील उपस्थित होत्या.

राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका सविता पाटिल व क्रांतिज्योति सवित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन डॉ. प्रतिभा पाटील यांनी केले. दीप प्रज्वलन करुन आणि लोकमान्य सोसायटीतर्फे आणलेले केक कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिलांनी भावगीते, कविता, चारोळी, मंत्र व ओवि सादर केल्या. यावेळी सविता पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

सौ. धनश्री होनगेकर यांनी सुत्रसंचलन केले. स्वागत सौ. लीलावती तेर्णिकर, प्रास्ताविक सौ. उज्वला उच्चुकर व सौ. सविता पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.
यावेळी कडोली सांस्कृतिक संघाचे माजी अध्यक्ष बाबुराव गौंडाडकर, अध्यक्ष बसवंत शहापुरकर, श्रीराम सोसायटीचे माजी अध्यक्ष भरमा डोंगरे, अरुण पाटील, शिवाजी कुट्रे, दीपक होनगेकर यांच्यासह संघाचे पदाधिकारी व असंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: