Belagavi

हिंडलगा शाळेत आ. हेब्बाळकर यांच्याहस्ते स्मार्ट क्लासचे उद्घाटन

Share

जग जसजसे विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे, तसतसे आपणही त्यात स्वत:ला जुळवून घेणे अपरिहार्य आहे. यादृष्टीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्मार्ट पद्धतीने शिक्षण देण्यासाठी सर्व सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत, असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील हिंडलगा गावातील शासकीय वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळेला कर्नाटक राज्य खनिज महामंडळ लिमिटेडने मंजूर केलेल्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या नवीन स्मार्ट क्लास सेवेचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या.

स्मार्ट क्लास सेवेमध्ये प्रोजेक्टर, एसी, बेंच, यूपीएस आणि इन्व्हर्टर, कॉम्प्युटर, प्रिंटर, टॅब, स्मार्ट कॅबिनेट, पोडियम, खिडकीचे पडदे, दरवाजा, मॅट्स, डिजिटल सामग्री, इलेक्ट्रीक उपकरणे, वॉल क्लॉक, नेम प्लेट, पेंटिंग, फरशा यासारख्या उपकरणांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा पुरेसा वापर करून ध्येय साध्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल उरणकर, विठ्ठल देसाई, चेतना अगसगेकर, सीमा देवकर, अशोक कांबळे, गजानन काकतकर, संतोष फर्नांडिस, एस.डी.एम.सी. सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

Tags: