पौष्टिक आहार घ्या आणि निरोगी राहा, असे आवाहन इटगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा यांनी केले.

इटगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित गर्भवती महिलांना महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. पूजा यांनी गर्भवती महिलांनी आपले व पोटात वाढणाऱ्या बाळाचे चांगले पोषण होण्यासाठी पौष्टिक आहार घ्या आणि निरोगी राहा, असे आवाहन केले. आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी उत्तम आरोग्य सल्ला दिला व गरोदर महिलांची विशेष काळजी कशी घ्यावी हे त्यांनी सांगितले.
यावेळी इटगी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांसोबत केक कापून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी आशा कार्यकर्त्या व अन्य उपस्थित होते.


Recent Comments