Dharwad

चमचे-पळ्यांनी सिलेंडर वाजवत दरवाढीचा निषेध

Share

स्वयंपाकाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा ५० रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ धारवाड येथे काँग्रेसतर्फे अभिनव आंदोलन करण्यात आले. महिलांनी चमचे-पळ्यांनी सिलेंडर वाजवत दरवाढीचा निषेध केला.

धारवाड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस गौरम्मा बलोगी यांच्या नेतृत्वाखाली सिलेंडर दरवाढीचा अभिनव पद्धतीने निषेध करण्यात आला. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. प्रभाग क्र. 5 गणेशनगर, धारवाड येथे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गौरम्मा बालोगी (नाद गौदरा) यांनी अभिनव पद्धतीने महिलांनी चमचे-पळ्यांनी सिलेंडर वाजवत दरवाढीचा निषेध केला. यावेळी दरवाढ करणाऱ्या केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.

Tags: