संपूर्ण जग नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहे. असा पंतप्रधान मिळाल्याने आपण भाग्यवान आहोत. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात मोठा फरक आहे असे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले.

चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात भाजपने आयोजित केलेल्या विजयसंकल्प यात्रेत बोलताना येडियुरप्पा म्हणाले की, मोदींसारखा पंतप्रधान मिळणे ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे. सारे जग त्यांचे गुणगान गाते. याची खातरजमा येथील जनतेने करावी. त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये भाजपचा विजय झाला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. कुठे नरेंद्र मोदी अन कुठे राहुल गांधी? या दोघांमध्ये मोठा फरक असल्याचे येडियुरप्पा म्हणाले.
पाच-सहा विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार नाही, असे वातावरण आहे, असे मी म्हटले आहे, पण शेवटी जो काही निर्णय होईल, तो हायकमांडच ठरवेल. कदाचित सगळ्याच विद्यमान आमदारांना तिकीट मिळाले तर आश्चर्य वाटायला नको असे ते म्हणाले.
यावेळी मंत्री गोविंद कारजोळ, शशिकला जोल्ले, आमदार रमेश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, अरुण शहापूर आदी उपस्थित होते.


Recent Comments