खानापूर तालुक्यातील नंदगडसह इतर गावात होळीचा सण व रंगपंचमी उत्साहात साजरा करण्यात आला.

खानापूर तालुक्यात गावोगावी पारंपरिक पद्धतीने पूर्ण पोळीचा नैवैद्य दाखवून होळी पूजन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी धुळवड व रंगपंचमी साजरी करण्यात आली.
नंदगडच्या गणपत गल्लीत भव्य स्टेज तयार करून परंपरेनुसार होळीचा उत्सव साजरा करण्यात आला.

तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी खास डीजेची व्यवस्था करण्यात आली होती. डीजेच्या तालावर रेन डान्स करत युवावर्गाने पाण्यात भिजत रंगपंचमी खेळली. काँग्रेसचे युवा नेते व व्यापारी महांतेश कल्याणी यांनी होळीची पूजा करून नैवैद्य अर्पण केला. पुढारी महांतेश वाली, शिवानंद वाली, रोहित गुरव मित्रमंडळ आदींनी तरुणांना प्रोत्साहन दिले. रंगोत्सव होळी शांततेत साजरा करून सर्वांसाठी एक आदर्श ठरला.


Recent Comments