Belagavi

साडी वाटपाच्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी

Share

रायबाग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे तिकीट इच्छुक माजी आयएएस अधिकारी शंभू कल्लोळकर यांनी केलेल्या साडी वाटपावेळी, त्या घेण्यासाठी कथित चेंगराचेंगरीची घटना रायबाग तालुक्यातील जोडट्टी गावात घडली.

कल्लोळकर मळ्यातील विहीर पूजन व ओटी भरण्याच्या कार्यक्रमादरम्यान साड्या वाटपाचे वृत्त समजताच महिलांची मोठी गर्दी झाली होती. त्यात अनेकजण जखमी झाले आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे पाच हजारांहून अधिक महिला साड्या घेण्यासाठी आल्या होत्या.

 

त्यामुळे गर्दीवर नियंत्रण न रहाता महिलांची चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत काही महिला जखमी झाल्या.साडी वाटप थांबल्याने बराच गोंधळ झाला. यामुळे संतापलेल्या महिला माघारी गेल्याचीही घटना घडली. रायबाग मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक असलेले शंभू कल्लोळकर यापूर्वी तामिळनाडूमध्ये आयएएस अधिकारी होते. पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आता रायबाग मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

Tags: