Belagavi

गुंजेनहट्टी यात्रेची तयारी पूर्ण; सीसीटीव्हीची राहणार नजर

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली ग्राम पंचायत हद्दीतील गुंजेनहट्टी गावची जागृत ग्राम देवता आणि कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यासह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री होळीकामाण्णा देवाची यात्रा उद्या होणार आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

दरवर्षीप्रमाणे धुलिवंदन दिवशी उद्या मंगळवार दि.०७ रोजी यात्रेला प्रारंभ होणार आहे. यावर्षी पुर्ण कोरोना निर्बंधमुक्त होणार असल्याने व दिवसेंदिवस भाविकांची वाढती संख्या व अमाप भाविक भक्तांची उपस्थिती अधिक असणार याची दक्षता घेऊन भक्ताना कोणताही त्रास, अनुचित प्रकार घडु नये यासाठी कडक बंदोबस्तासह मुख्य ठिकाणासह सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची विनंती यात्रा समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली होती. त्याचप्रमाणे काकती पोलीस, आरटिओ अधिकारी व हेस्काम अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.

यात्रा कमिटीतर्फे जय्यत तयारी चालु असुन ग्राम पंचायतीतर्फे नरेगा कामगाराकडुन गाव स्वच्छता अभियाण राबविण्यात आले आहे. मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटी, प्रवेशद्वारापासुन मंदिरापर्यंत भव्य असा मंडप उभारून आकर्षक विद्युत रोषणाई करुन भाविकांना दर्शनासाठी जाण्याचा व येण्याचा एक स्वतंत्र मार्ग करण्यात आले आहेत. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी स्क्रिन पडद्यावरच देवाचे लाईव्ह दर्शनही यावर्षी घडवण्यात येणार आहे. फ्लो
याबाबत यात्रा कमिटी प्रमुख अडव्होकेट शाम पाटील यांनी अधिक माहिती दिली.

भाविकांसाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली असुन या ठिकाणचे रस्तेही अरुंद असल्याने शिवारामधील पिकांची नासाडी होऊ नये याची भाविकांनिही दक्षता घेऊन आपले वाहने ट्रॅाफिक जाम होऊ नये म्हणून दक्षिण- कडोली विभाग व उत्तर- देवगिरी विभाग या दोन्हिही बाजूला अधिकृत वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक विद्युत भार पडू नये म्हणून हेस्कामलाही कळवून ट्रान्सफार्मर उभारला आहे. याबाबत ग्रा.पं.सदस्य गौडाप्पा पाटील यांनी माहिती दिली.

यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलीस संरक्षणची व्यवस्था करण्यात आली असुन यात्रा कमिटी पदाधिकारी, ग्राम पंचायत व पुजारी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी उत्तमरित्या नियोजन करुन अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

Tags: