हुक्केरी पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार यांनी हुक्केरी शहरात मंगळवार 7 मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्याचे आवाहन केले. पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता सभेत बोलताना ते म्हणाले की, होळीचा सण जातीभेद न ठेवता रंगांचा सण सामंजस्याने व आनंदात साजरा झाला पाहिजे.

नेते सुभाष नाईक, उदय हुक्केरी, शिवराज नाईक यांनी बोलतांना सांगितले की, हुक्केरी लक्ष्मीदेवीची जत्रा 14 मार्चपासून होणार असून 7 मार्च रोजी होळीचा सण रंगांची उधळण करून शांततेत साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष अण्णाप्पा पाटील, उपाध्यक्ष आनंद गंध, जयगौडा पाटील, मुस्लिम समाजाचे नेते नदाफ, नगर परिषद सदस्य राजू मुन्नोल्ली, कबीर मल्लिक, सलीम कलावंत, अशोक अंकलगी, गजबरवाडी, राजू मुजावर आदी उपस्थित होते.


Recent Comments