Belagavi

वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनासाठी द्यावे प्राधान्य

Share

वन्यजीवांचे संवर्धनासाठी सर्वानी प्राधान्य दिले पाहिजे . पर्यावरण संतुलन राखून, त्याचे संरक्षण केले तरच आम्ही श्वास घेऊन शकू असे बेळगावचे डीएफओ हर्ष बानू म्हणाले .

बेळगावमधील भुतरामनहट्टी येथील वन्यजीव आणि पर्यावरण विकास मंच आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने , राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात , बेळगाव वन्यजीव आणि पर्यावरण विकास मंचाच्यावतीने वन्यजीव दिनाचा कार्यक्रम आणि तिसरा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला .

राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालय , सर्वाना आकर्षित करीत आहे . प्राणी दत्तक घेण्यासाठी देणगीदारांनी पुढे यावे, आगामी काळात अधिकाधिक वन्य प्राणी आणले जातील असेही ते म्हणाले.
बेळगावचे माजी महापौर एन.बी.निर्वाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . वाघ आणि सिंहांसह सर्व वन्य प्राणी पाहण्याची संधी येथे आहे. वन्य प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर मानवाने अतिक्रमण केल्याने , ते शहरांकडे येत आहेत .

मंचाचे सरचिटणीस डॉ. डी.एन.मिसाळे यांनी जंगलातील मानवी अतिक्रमण आणि वन्य प्राण्यांवर होणारे हल्ले याविषयी सविस्तरपणे सांगितले तसेच वन्यजीव व पर्यावरणावरील क्रूर मानवी हस्तक्षेप थांबवण्याची इच्छा व्यक्त केली.

वन्यजीव, पर्यावरण विकास मंचाचे अध्यक्ष उरबीनहट्टी यांनी स्वागत केले . जगदीश माथाडी , संचालक डॉ. विलास केरुर,
एस जी कल्याणी, डी. एम. टोणे, आर.एफ.ओ. केम्पण्णा वानुरी , अभिनंदन मगदूम, बीट फॉरेस्ट, हुक्केरी आर.पी.ओ. प्रसन्न बेल्लद , डॉ. नागेश हुईलगोल , , परशुराम गिरेन्नवर, यल्लाप्पा. गिरेण्णावर यांच्यासह पर्यटक व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: