Belagavi

बेळगावमध्ये चौथे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन

Share

बेळगाव नगरी ही साहित्यिकांची नगरी आहे . या भूमीत अनेक साहित्यिक होऊन गेले . आणि नवे कवी , साहित्यिक उदयाला येत आहेत . या पवित्र नगरीत अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन होत आहे ही अभिमानाची बाब आहे असे ऍड . सुधीर चव्हाण मानले .

बेळगावमध्ये चौथे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले . या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ऍड . सुधीर चव्हाण बोलत हॊते . या नगरीला अनेक नामवंत , कवी आणि लेखकांचा वारसा लाभला आहे . मराठी भाषेचा आणि साहित्याचा हा वारसा पुढे जपण्यासाठी , या भूमीत अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीनेचौथे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले .

शहरातील , मराठा मंदिर येथे आयोजित केलेल्या या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली . महिला भजनी मंडळांच्या सुरेल भजनाने , ताल मृदूंगाच्या तालावर , ही ग्रंथदिंडी काढण्यात आली . संमेलनाच्या अध्यक्षा , पुणे येथील जेष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे , स्मिता चिंचणीकर आणि स्मिता मेंडके आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे , मराठी प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून साहित्य संमेलनाचे उदघाटन करण्यात आले .
यावेळी संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे आणि अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले .

Tags: