Belagavi

जय हिंद फाउंडेशनतर्फे वीरपत्नी, मातांसाठी हळदीकुंकू

Share

जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शहापूर येथील विश्वकर्मा मंगल कार्यालयामध्ये एसपीएम रोड शहापूर बेळगाव येथे वीरपत्नी, मातांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद फाउंडेशनचे कोल्हापूर विभाग प्रमुख राष्ट्रीय संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ केशव राजपुरे, सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, जय हिंद फाउंडेशनच्या राष्ट्रीय संचालिका मनीषा अरगुणे, सातारा जिल्हा महिला प्रमुख उर्मिलाताई कदम तसेच महिला संपर्कप्रमुख बेळगाव वीर पत्नी सुनीता पाटील उपस्थित होत्या.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना किरण जाधव यांनी वीर पत्नींना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महिला दिन हा फक्त महिला दिनापुरता मर्यादित नसून महिला दिन हा दररोज साजरा होत असतो. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही महिलांपासून होत असते. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला उभ्या आहेत.

ज्याप्रमाणे महिला पुरुषाला साथ देतात त्याचप्रमाणे आपण पुरुषवर्गाने सुद्धा महिलांना पाठिंबा दिला पाहिजे आपली आई पत्नी बहीण त्याचबरोबर समाजातील सर्व भगिनींना पुढे येण्यास मदत केली पाहिजे असे प्रतिपादन केले.

त्यानंतर डॉ केशव राजपुरे यांनी जय हिंद फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली आणि जय हिंद फाउंडेशन शहीद सैनिक आणि त्यांच्या कुटुंब कल्याणासाठी सामाजिक कार्य करणारी एकमेव संस्था असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी या शाखेचा बेळगाव मध्ये आज पासून शुभारंभ झाला असल्याचे यावेळी सांगितले.

त्यानंतर उपमहापौर आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर व अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व वीर पत्नींचा आणि त्यांच्या आईचा सत्कार करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता नाईक-देसाई यांनी केले. तर प्रास्ताविक सुनिता पाटील यांनी केले. तर आभार रेखा खादरवाडकर यांनी मानले यावेळी या कार्यक्रमाला वीर पत्नी माता त्याचबरोबर जय हिंद फाउंडेशन कोल्हापूर आणि साताराचे सदस्य उपस्थित होते.

Tags: