घरात गरीब परिस्थिती , राबल्याशिवाय घरात चूल पेटत नाही . त्यातच दुर्दैव असे कि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या या तरुणाला यकृत प्रत्यारोपणाशिवाय जगण्याचा पर्याय उरलेला नाही . पाहुयात नेमकी काय परिस्थिती आहे ते ….

चिकोडी तालुक्यातील करोशी गावातील बाजीराव सुळकुडे असे या तरुणाचे नाव असून ,त्याला यकृताच्या सिरोसिसचा त्रास आहे. डॉक्टरांनी त्यांना यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला आहे. बाजीरावांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्याच्यावर त्याच्या वृद्ध आईची देखील मोठी जबाबदारी आहे. आता त्याला स्वतःच्या वैद्यकीय खर्चासाठी 22 लाख रुपयांची गरज आहे. हातात पैसा नसल्याने बाजीवरावाची पत्नी आणि वृद्ध आईने बाजीवरावला वाचवण्यासाटी देणगीदारांना आवाहन करीत आहेत .
बाजीराव आपल्या कुटुंबाचा गाडा वाहून नेण्यासाठी गावात पानशॉप चालवत होता आणि आता त्याला गंभीर आजाराने ग्रासले आहे.
बाजीराव सुळकुडे हे गेल्या दोन वर्षांपासून यकृताच्या आजाराने त्रस्त आहेत . कुटुंबीयांनी कर्ज काढून निपाणी आणि बेळगाव येथील अनेक रुग्णालयात उपचार घेतले आहेत. पण काही उपयोग झाला नाही. तात्पुरते बरे होते. पण पुन्हा तब्येत बिघडते.
बाजीराव यांच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी आतापर्यंत आठ लाखांपर्यंत खर्च केला आहे.
त्यांच्यावर सध्या बेळगाव येथील केएलई संस्थेच्या डॉ.प्रभाकर कोरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथील एका वरिष्ठ डॉक्टरांनी बाजीराव सुळकुडे यांचे यकृत निकामी होत असून त्यांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे सांगितले आहे .
यासाठी सुमारे 22 लाख रुपये खर्च येणार आहे. पण कुटुंबाकडे पैसे नाहीत. आता यकृत प्रत्यारोपण आणि इतर वैद्यकीय उपचारांसाठी पैसे नाहीत.
बाजीराव सुलकुडे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून त्यांना लवकरात लवकर यकृत प्रत्यारोपणाची गरज आहे.
त्यामुळे लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्ती, संस्था, देणगीदार, नागरिक यांच्याकडून आर्थिक मदत मिळावी, अशी विनंती कुटुंबीयांनी केली आहे.
फेडरल बँक खाते क्रमांक: 19390100033095
IFSC कोड: FDRL0001939 किंवा 9632731806 या क्रमांकावर मदत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकंदरीत, बाजीराव सुळकुडे यांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी दानशूरांनी सढळ हस्ते मदत करावी आणि त्यांचा जीव वाचवावा असे आवाहन करण्यात येत आहे.


Recent Comments