Belagavi

जुन्या , भंगलेल्या , देवदेवतांच्या फोटोंचे संकलन करून विधिवत केले दहन

Share

वीरेश बसैया हिरेमठ यांनी सांगितले की, देवदेवतांच्या 4,000 हून अधिक भंगलेल्या त्याचप्रमाणे खराब झालेल्या प्रतिमा गोळा करून , हिंदू प्राचीन संस्कृती आणि धार्मिक प्रथेनुसार पूजन करून , त्यांचे दहन करण्यात आले .

शहरातील बसव कॉलनी येथे आज वीरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकसेवा फाऊंडेशनने गेल्या चारपाच महिन्यांपासून गोळा केलेले जुन्या देवतांच्या 4 हजारांहून अधिक फोटोंचे मंत्रोपचारात दहन करण्यात आले . ही राख वड , पिंपळ , आदी वृक्षाना घालण्याचे विरेश हिरेमठ यांनी सांगितले .

यावेळी महापालिकेच्या उपमहापौर रेश्मा पाटील म्हणाल्या ,कि , विरेश हिरेमठ हे चांगले काम करीत आहेत . लोकांनी आपल्या घरातील देवदेवतांचे जुने तसेच खराब झालेले फोटो कुठेही टाकून ,त्याची विटंबना करू नये . असे आवाहन त्यांनी केले .

यावेळी , आनंद पाटील, प्रवीण पाटील, उज्वलादेवी पाटील, यल्लावा पाटील आणि इतर उपस्थित होते.

Tags: